रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांना दिशा देणारे एक आदर्श व्यक्तिमत्व श्री. ऋषिनाथ ( दादा) पत्याने



विशेष लेख | दिपक मांडवकर

 

    समाजकारणात येणाऱ्या काही व्यक्ती अशा असतात की , त्यांचा सहवास नेहमीच प्रेरणादायी व हवाहवासा असतो.त्या सहवासाने आपले आत्मबल वाढवण्यास व नवा उत्साह व नवचैतन्य निर्माण करणारा असतो. परंतु त्यांच्या बाबतच्या भावना व्यक्त करतांना कोणत्या प्रकारे करावी हेच कळत नाही . अशी स्थिती आज ऋषीनाथ दादा पत्याणे यांच्या विषयी विचार मांडतांना माझी होत आहे. ज्या माणसाने रत्नागिरी जिल्हात माणसांचा एक मोठा गोतवळा निर्माण केला आहे. त्यांचे मित्रपरिवार हे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आज महाराष्ट्रभर विखुरलेले दिसतात. याचे कारण दादा हे प्रत्येकाच्या सुख-दुखात सतत सहकार्य व मदतीची तयारी हे त्यांच्या स्वभावाचे खरे वैशिष्ट्य आहे .ते सर्वसामान्य कुटुंबातुन पुढे आलेले असल्यामुळे सामान्य माणसाबाबत दादांच्या मनात नेहमी आदराची व सहकार्याची भावना असल्यामुळे दादांच्या घरात समस्या घेवुन येणारा व्यक्ती समाधानी होवुनच जातो.या बाबत अनेक उदाहरणे मी पाहीले आहेत म्हणुन दादा आज सर्व सामान्याच्या मना-मनात घर करून आहेत.


   अखंड रत्नागिरी जिल्ह्यात कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि घटकातील ग्रामस्थ, विद्यार्थी व तरुणाना  स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. मा. ऋषीनाथ (दादा) पत्याने स्वराज्य प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून एक वेगळीच दिशा दिली आहे.  लांजा तालुक्यातील वाघ्रट गावातील रहिवाशी पण उच्च विचार सरणीच्या जोरावर स्वप्नांना गवसणी घालणाऱ्या कर्तुत्वाला दिशा मिळाली आणि दादांनी १ जानेवारी २०१२ साली "स्वराज्य प्रतिष्ठान लांजा"या संस्थेची स्थापना केली. संस्थापक म्हणून दादांचे कार्य आज अखंड रत्नागिरीतील विविध तालुक्यातील चुली चुली पर्यंत पोहोचले आहे.जिल्हा व तालुक्यातील हि संस्था आता आधार स्थंभ बनली आहे.


    नुकत्याच राज्यात तांडव माजवणाऱ्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून लांजा तहसीलदार कार्यालय ते खानवली, सापूचेतळे व अन्य परिसरात कोरोना निर्जंतु कीटकनाशक  फवारणी करण्यात आली. व येथील नागरीकांना कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रक्षण करण्यास स्वता पुढाकार घेतला.या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, ग्रामस्थाना वैद्यकीय मदत, गोर गरिबांना सुख सुविधा, बस स्थानके, रस्ते, स्टेट लाईट, पाणी, स्वच्छता अन्य अगदी सर्वच क्षेत्रात मदत कार्य करणे हे या प्रतिष्ठानचे प्रमुख उद्धिष्ट आहे. आणि याच कार्याच्या जोरावर नवनिर्माण फाऊंडेशनच्या वतीने राज्य स्तरीय पुरस्कार या प्रतिष्ठानच्या शीरचेपी खोवला गेला आहे.


    त्याच प्रमाणे त्यांच्या सत्कार्यात खारीचा वाटा म्हणजे स्वराज्य प्रतिष्ठानचे प्रत्येक सभासद अगदी नेतृत्वाला ऊभारी  देणारे कार्य करताना पाहायला मिळत आहे. त्यात प्रामुख्याने जेष्ठ मार्गदर्शिका सौ. प्रणिता पत्याने (बोरकर) तथा केंद्र बिंदू समजणारे प्रामुख्याने स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. विनायक खानविलकर यांचे देखील नेतृत्व तितकेच महत्वपूर्ण कार्य व जबाबदारी घेताना नागरिकांना पहायला मिळत आहे. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष पदाची जबाबदारी असताना  महात्मा गांधी तंटामुक्त समिती खानवलीचे नेतृत्व व विविध पदाची जबाबदारी असे कार्य करून प्रतिष्ठानचे नाव उंच शिखरावर नेऊन ठेवले आहे. तसेच मंडळातील सचिव श्री. डी.डी. कुर्डेकर, आलीम काझी तथा श्री. प्रशांत इंदुलकर, प्रमिल पत्याने, संतोष पत्याने, मार्गदर्शक श्री. नितीश पत्याने, संजू पत्याने,सुनील पत्याने,अरविंद पत्याने, इलियाज बंदरी (पूनस सरपंच), रुपेश रेवाले, प्रवीण मेस्त्री,महेंद्र शेलार, वसंत पत्याने, विनोद (पांड्या) सावंत, हे नाव टाका  व सर्व सभासद देखील या संघटनेचा एक केंद्र बिंदू आहेत.



जिल्ह्यातील तरुण युवक व युवतीला स्वराज्य प्रतिष्ठानच्या विचार मंचच्या व्यासपीठा वरून विविध क्षेत्रातील तज्ञ व मार्गदर्शन जनसेवेच्या प्रवाहात आणन्याचे व जिल्याती तरुणांना दिशा देणारे नेतृत्व श्री. ऋषीनाथ दादा पत्याने करत आहेत.

टिप्पण्या