ठाणे एसटी स्टॅंडजवळ मांडूळ प्रजातीचा दुर्मिळ (वन्यजीव) विक्रीस आणलेल्या दिव्यातील आरोपीस अटक


गुन्हे शाखा घटक-१, ठाणेची कामगिरी "


ठाणे(प्रतिनिधी) ठाणे एसटीस्टॅंड परिसरात मांडूळ जातीचा वन्यजीव सर्प विक्रीसाठी आलेल्या इसमास गुन्हे शाखा घटक-१ ने अटक केली असून सुमारे १ किलो ४०० ग्रॅम वजनाचा व ४२ इंच लांबीचा जीवंत मांडुळ प्रजातीचा दुर्मिळ (वन्यजीव) ताब्यात घेण्यात आला आहे.हा आरोपी दिव्यातील लहु म्हात्रे चाळ येथील रहिवाशी आहे.


   १७ मार्च रोजी  एक जीवंत मांडुळ प्रजातीचा दुर्मिळ (वन्यजिव) सर्प विकण्यासाठी ठाणे एस.टी. स्टॅड येथील टीप टॉप स्विट दुकानाचे समोर एक इसम येणार असल्या बाबत गुन्हे शाखा,घटक-१,ठाणेचे पोलीस हवालदार सुभाष मोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली होती.या बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक–१ ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव व त्यांचे पथकाने दि.१७ मार्च रोजी ठाणे एस.टी. स्टॅड येथील टीप टॉप स्विट दुकानाचे समोर सापळा लावुन भगवान रामदास पाटील, वय-३८ वर्षे, रा. लहु म्हात्रे चाळ, पहीला माळा, रूम नं. २, दिवा प, जिल्हा-ठाणे यास ताब्यात घेण्यात आले आहे.


 या घटनेचा अधिक तपास केला असता गुन्हेगाराकडून सँगबॅग मधील गुलाबी रंगाच्या कापडी पिशवीमध्ये सुमारे १ किलो ४०० ग्रॅम वजनाचा व ४२ इंच लांबीचा जीवंत मांडुळ प्रजातीचा दुर्मिळ (वन्यजीव) मिळुन आला. सदर इसमाविरुध्द ठाणेनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजि.नं. ९३/२०२०, वन्यजिव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम-३९ (३) सह कलम-५१ प्रमाणे दि.१७ मार्च २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय सरक हे करीत आहेत.


सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री.विवेक फणसळकर, पोलीस सह आयुक्त डॉ.सुरेश कुमार मेकला मा. अप्पर पोलीस आयुक्त, (गुन्हे ) श्री. प्रविण पवार, मा.पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) श्री. दिपक देवराज, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे (शोध–१) श्री. किसन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहा.पो.निरीक्षक समीर अहिरराव,पोउपनिरी दत्तात्रय सरक, पोहवा/सुभाष मोरे, पोना.दादासाहेब पाटील, चंद्रकांत वाळुज, मपोशि.निलम पाचपुते व पोलीस पथकाने केली आहे.


टिप्पण्या