डॉ.आ.राजन साळवींच्या मतदार संघासाठी अर्थसंकल्पातून २२ कोटीची भरघोस तरतूद


मुंबई(प्रतिनिधी)   राज्याच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.राजन साळवी यांनी स्वतःच्या विधानसभा मतदार संघातील प्रस्तावित केलेल्या विकासकामांना मंजूरी देण्यात आली असुन यासाठी २२ कोटी रूपयांची भरघोस तरतूदही राज्य शासनाने केल्याने राजापूर,लांजा व साखरपा विधानसभा मतदार संघाने विकासाच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे.


आ.राजन साळवी यांनी स्वतःच्या राजापूर,लांजा व साखरपा हया विधानसभा मतदार संघातील आत्यंतिक महत्वाची तसेच ग्रामीण भाग शहराला जोडणे हा दृष्टीकोन समोर ठेवून काही विकासकामांचे प्रस्ताव शासन दप-तरी गत साली राज्य शासनाला सादर केले होते. आ.साळवींनी अत्यंत नियोजनपूर्ण दिलेल्या हया विकासकामांना राज्य शासनाने मुंबई येथे चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमीत्ताने मंजूरी दिली असून दळवळणाच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी तब्बल २२ कोटी रूपयांची आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. सदरील कामांच्या पूर्णत्वामुळे हया मतदार संघातील जनतेच्या अनेक मुलभूत समस्या मार्गी लागणार आहे


आ.राजन साळवी यांनी प्रस्तावित केलेले व शासनाने निधीच्या तरतूदीसहित मंजूरी दिलेली विकासकामे खालील प्रमाणे असून हया कामांना शासकीय बाबींच्या परिपूर्ती अंती प्रत्यक्षात प्रारंभ होईल व उर्वरीत विकासकामांचे प्रस्ताव निधी मंजूरीसाठी विविध स्तरावर देण्यात आले असे आ.साळवी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
राजापूर तालुक्यातील धोपेश्वर पन्हाळे गोवळ शिवणे बुरंबेवाडी रस्ता प्रजिमा  क्र.७१ वर सा.क्र. १/४५० मध्ये लहान पुलाचे रुंदीकरण बांधकाम करणे,  व्हेळ रिंगणे पाचल मूर जवळेथर रस्ता प्रजिमा क्र.६४ कि.मी.१८/६०० मध्ये कोंजवेच्या ठिकाणी पुलाचे बांधकाम करणे, मुर कार्जीडा रस्ता [जिल्हा सिमेपर्यंत]प्रजिमा क्र.६५ वर सा.क्र. ०/६७० मध्ये कोंजवेच्या ठिकाणी लहान पुलाचे बांधकाम करणे, मुर कार्जीडा रस्ता प्रजिमा क्र.६५ वर सा.क्र. 1/230 मध्ये कोंजवेच्या ठिकाणी लहान पुलाचे बांधकाम करणे, सौंदळ तुळसवडे ताम्हाणे रस्ता प्रजिमा क्र.६६ कि.मी. २/९०० मध्ये कोंजवेच्या  ठिकाणी पुलाचे बांधकाम करणे, सौंदळ तुळसवडे ताम्हाणे रस्ता प्रजिमा क्र.६६ कि.मी. 5/780 मध्ये कोंजवेच्या  ठिकाणी पुलाचे बांधकाम करणे, माजळ जावडे इसवली पनोरे भालावली धारतळे रस्ता प्रजिमा 63 कि.मी.23/00 ते 25/00 मजबूतीकारण व डांबरीकारण करणे, उन्हाळे दोनीवडे-केळवली-जवळेथर रस्ता प्रजिमा - 73 सा.क्र.22/770 कोंजवेच्या ठिकाणी लहान पुलाचे बांधकाम करणे, रेवस रेड्डी रस्ता (नाटे ते आंबेरी) एमएसएच -4 वर सा.क्र. ५९५/२ ७० मध्ये कोंजवेच्या ठिकाणी लहान पुलाचे बांधकाम करणे, रेवस रेड्डी रस्ता (नाटे ते आंबेरी) एमएसएच -4 वर सा.क्र. ५९६/८१० मध्ये कोंजवेच्या ठिकाणी लहान पुलाचे बांधकाम करणे, आंबोलगाड राघोबाचीवाडी धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे
तसेच लांजा तालुक्यातील वेरवली कोर्ले प्रभानवल्ली खोरनिनको विशालगड रस्ता प्रजिमा.६२ रस्ता रा.मा.१५० कि.मी.१२/१०० ते १६/५०० मध्ये मजबूतीकरण व  डांबरीकरण करणे, लांजा वेरवली कोर्ले प्रभानवल्ली खोरनिनको विशालगड रस्ता प्रजिमा ६२ कि.मी.१२/०५०,१८/२५०,१८/९५०, २०/२८५ व २१/०७० मधील कोंजवेच्या ठिकाणी लहान पुलांचे बांधकाम करणे, विठापेठ मलकापुर अणूस्कूरा साटवली पावस रस्ता रामा 150 किमी 192/700 ठिकाणी  पुलाचे बांधकाम करणे,


टिप्पण्या