मुंबईतील वैश्याव्यवसाय सुरुच,कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तातडीने बंद करा - संदिप साबळे


राजमुद्राच्यावतीने राज्यसरकारकडे मागणी

 

मुंबई ( प्रतिनिधी)  राज्याच कोरोना विषाणुने शिरकाव केल्यामुळे राज्यसरकारने शाळा,काॅलेज,थिएटर,सार्वजनिक सभा यांवर बंदी आणली असतानाचा मुंबईतील वैश्याव्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे.या व्यवसायामुळे परस्पर सबंध येत असल्याने तसेच कोरोना फैलावण्याची जास्त शक्यता असल्याने अशी ठिकाणे राज्य सरकारने तातडीने बंद करावीत अशी मागणी राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संदिप साबळे यांनी राज्यसरकारकडे  केली आहे.

     

    राज्यात आत्तापर्यंत ३२ जण कोरोना विषाणु बाधित झाले आहेत.कोरोणा विषाणू संपुर्ण भारतासह विविध राज्यांत पसरु लागला आहे.यावर खबरदारी म्हणुन राज्यसरकारने विविध शाळा,काॅलेज,सभा,आंदोलने करण्यास बंदी घातली आहे.परंतु मुंबईतील सर्वाधिक धोका आणि विषाणुं फैलावण्याची शक्यता असलेल्या वैश्याव्यवसायावर कोणतीही बंदी नसलेली पहावयास मिळत आहे.अशी ठिकाणी राजरोसपणे सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे भिती व्यक्त करण्यात येत आहे.

   कोरोना लागण ही  बाधित  व्यक्तिंच्या संपर्कात गेल्याने होत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे.त्यामुळे वैश्याव्यवसायामध्ये हा संपर्क अत्यंत जवळचा येत असल्याने एखादा कोरोनाबाधित रुग्ण याठिकाणी गेल्यास विषाणु इतरांनाही बाधा निर्माण करु शकतो.त्यामुळे आजूबाजूच्या वस्तींतही या विषाणूंचा मोठा फैलाव होऊ शकतो.त्यामुळे यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य सरकारने अशा व्यवसायांवर तातडीने बंदी आणत कारवाई करावी अशी मागणी राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संदिप साबळे यांनी केली आहे


टिप्पण्या