ठाणे जि.प.कर्मचारी संदेश म्हस्के आणि  हिरामण खाडे यांना राज्य शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान


ठाणे ( प्रतिनिधी)  :  ठाणे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागात वरिष्ठ सहायक पदावर कार्यरत असणारे संदेश म्हस्के आणि ग्रामविकास अधिकारी हिरामण खाडे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत कर्मचारी पुरस्कार गुरुवार १२ मार्च रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संपन्न झाला.


जिल्हा परिषद स्तरावर उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी यशवंत पंचायत राज अभियाना अंतर्गत पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. श्री. म्हस्के हे २००० साली  कनिष्ठ सहाय्यक पदावर रुजू झाले.  सध्या ते जिल्हा परिषद कृषि सभापती यांचे स्वीय सहायक म्हणून काम करत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना (रजिस्टर 615 ) ठाणे शाखेचे  जिल्हा सचिव म्हणून काम पाहत आहेत. तर  श्री.खाडे २००४ साली सेवेत रुजू झाले सध्या ते ग्रामपंचायत वाफे येथे  ग्रामविकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने या दोघांचे अभिनंदन करण्यात आले.


टिप्पण्या