लाऊड-9 कॅफे & रेस्टाॅरन्ट हुक्का पार्लरवर उथळसर प्रभाग समितीची कडक कारवाई 


ठाणे (प्रतिनिधी)  संपुर्ण देशभर कोरोनाग्रस्त लोकांची संख्या वाढच चालली असताना आणि राज्यशासनाने गर्दीची ठिकाणे टाळा असे आदेश असताना मात्र ठाण्यातील लाऊड-9 कॅफे & रेस्टाॅरन्ट या हुक्का पार्लर मात्र गर्दीने वाढत होता.यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  ठाणे महानगर पालिकेचे उथळसर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त श्री शंकर पाटोळे यांच्या निर्देशानुसार या पार्लरवर धडक कारवाई करत सदरचे दुकान बंद करण्यात आले आहे.

    राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे लोकांनी गर्दीची ठिकाणे टाळा ्असे आदेश राज्यसरकारने दिले आहेत.असे असतानाही उथळसर प्रभाग समितीलगतच असलेल्या या हुक्का पार्लरमध्ये अनेक ग्राहकांनी गर्दी केली होती.त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी प्रभाग समितीत तक्रारी केल्या होत्या.त्यामुळे अखेर सहाय्यक आयुक्त श्री शंकर पाटोळे यांनी निर्देश देत पालिका कर्मचारी आणि  पोलीसांच्या मदतीने सदरचा पार्लर बंद करुन टाकला.पुढील कारवाई राबोडी पोलीसांमार्फत करण्यात येत आहे. दरम्यान ३१ मार्चअखेरपर्यंत ठाण्यातील विविध गर्दीची ठिकाणे आढळल्यास त्यांवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कडक कारवाई करण्यात येईल असे श्री पाटोळे यांनी सांगितले आहे

टिप्पण्या