बदलापूर येथे भिम महोत्सव उत्साहात संपन्न झाला
मुंबई (महेंद्र कांबळे) - दिनांक २३ फेब्रुवारी सायंकाळी ५ :०० घोरपडे मैदान बदलापूर येथे भिम महोत्सव उत्साहात संपन्न झाला. हजारोंच्या संख्येने भिम अनुयायी आणि सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता या महोत्सवात सामील झाले होते. कार्यक्रमात कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अॕड.प्रियेश जाधव त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीचे युवा नेतृत्व म्हणून प्रसिद्द असलेले प्रवीण भाऊ राऊत ही प्रामुख्याने उपस्थित होते अनेक मान्यवरांचा सत्कार ही करण्यात आला त्याच बरोबर बदलापूर येथे आंबेडकरी चळवळीत स्वताला झोकून देणारे पत्रकार तसेच वंचित बहुजन आघाडीचे बदलापूर प्रसिद्धी प्रमुख आयु. योगेश येलवे यांचा सत्कार प्रविणभाऊ राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.
सुप्रसिद्ध गीतकार, प्रबोधनकार व नाटककार मा. अनिरुद्ध वनकर यांचा संगीत कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा