देशसेवा करुन सेवानिवृत्त झालेले सैनिक दिपक राजवीर यांचा जन्मभूमीत जंगी स्वागत
रत्नागिरी :(विशाल मोरे/नितीन शिगवण ) रत्नागिरी जिल्हा चिपळूण तालुक्यातील वेहळे राजवीर वाडीतील सैनिक श्री दिपक सीताराम राजवीर यांना लहानपणापासूनच भारतीय सैन्य दलात जाण्याची खूप आवड होती. परिस्थिती सर्व साधारण असल्या कारणाने त्यांनी आपले सर्व शिक्षण ग्रामीण भागातच पूर्ण करून त्यांनी कोल्हापूर येथून आपल्या सैन्य दलातील प्रवासाला सुरवात केली.
कोल्हापूर येथून बंगलोर येथे पहिल्या ट्रेनिंग साठी रुजू झाले. तिथला अनुभव हा फार खडतर होता त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. त्यामध्ये बेसिक ट्रेनिंग सहा महिने झाली त्यांनतर टेक्निकल ट्रेनिंग एक वर्ष पूर्ण करून पहिली पोस्टिंग पंजाब येथील पटियाला येथे झाली हे करत करत नंतर जम्मूकाश्मीर ते नागालँड येथे पोस्टिंग झाली अशा या त्यांच्या प्रवासात खूप मोठ्या व खडतर आव्हानांना सामोरे जावे लागले या त्यांच्या १७ वर्षांच्या काळात भारतमातेच्या रक्षणासाठी त्यांनी अगदी तनमन धनाने आणि प्रामाणिक पणाने सेवा करत ३१ जानेवारी २०२० रोजी निवृत्त झाले. त्यांच्या हातून भारतमातेसाठी सेवा करण्यासाठी त्यांच्या बरोबर त्यांच्या आईवडील व त्यांची पत्नी यांनी देखील खूप मेहनत व परिश्रम करून खूप लाखमोलाचे सहकार्य केले. देशाची सेवा करून ते जेव्हा आपल्या कोकणातील मायभूमीत परतले तेव्हा हजारो ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेथून ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या गावापर्यंत ताशांच्या गजरात भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली व तालुक्यातील व गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा