दिवा रेल्वेस्थानकावरील स्टाॅलवर हिंदीतून मजकुर,मनसेचे रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन


ठाणे (प्रतिनिधी) ठाण्यातील दिवा स्थानकावर रेल्वे प्रशासनाच्या कृपाआशिर्वादाने प्रथमच स्टाॅल सुरु करण्यात आला असून या स्टालवरील पदार्थांच्या किंमतीतील मजकूर मात्र हिंदीतून असल्याने मराठी जणांच्या भावना दुखावल्या आहेत. सदरचा स्टाॅलधारकाने याचे उद्धघाटनही मराठी  राजभाषा दिनी केल्याने आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे हा मजकुर लवकरात लवकर बदलण्यात यावा यासाठी निवेदन सादर केले आहे.
   मध्य रेल्वेचा दिवा स्थानक प्रचंड उसळणाऱ्या गर्दीमुळे सतत चर्चेत आहे.याच स्थानकावरुन रेल्वेने प्रवास करण्यासाठी येथील जनतेला मोठी कसरत करावी लागते.सकाळदरम्यान या स्थानकावर आपल्या इच्छित स्थळी प्रवास करण्यासाठी अनेक गाड्या सोडाव्या लागतात.त्यामुळे इतर स्टेशनांप्रमाणे दिवा स्थानकावरही एखादी खाण्यापिण्याची सोय व्हावी ही जनतेचीच इच्छा आहे.मात्र रेल्वे प्रशासनाच्या कृपाशिर्वादाने ठेकेदाराला हा स्टाॅल सुरु करण्याचा ठेका मिळाला असला तरी आज महाराष्ट्राच्या राजभाषा दिनी शुभमुहूर्त शोधून सुरु केलेल्या स्टाॅलवर मात्र मराठी भाषेत कोणत्याही पदार्थांच्या किंमतीची माहीती नाहीत.त्यामुळे आज दिव्यातील संपुर्ण मराठी बांधवांचा,मराठी भाषेचा अपमान या ठेकेदाराने केला असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला आहे.
    या स्टाॅलबाबत जनतेचा रोष लक्षात घेवून मनसे दिवा अध्यक्ष श्री तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेच्या अधिकार्यांना हिंदी भाषेतील मजकूर बदलण्याची मागणी केली.याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.


टिप्पण्या