भिंतीस होल पाडुन लॅच तोडुन घरफोडी चोरी करणारी टोळी अर्नाळा सागरी पोलीसांनी पकडली


विरार (गोवर्धन बिहाडे ) विरार पश्चिम हे घरी नसताना त्यांचे बंद घराचे दरवाजाची कडी कोयंडा तोडुन व लॅच लॉक उचकटुन घरात प्रवेश करुन बेडरुम मधील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागीणे व रोख रक्क्म, व चांदीचे शिक्के, मर्ती,डॉलर असा एकुण २,८४,६००/-रुपये किंमतीचा माल घरफोडी चोरी करुन चोरुन नेणाऱ्या टोळीला अर्नाळा सागरी पोलीसांनी शिताफीने पकडली आहे.


   या गुन्हयातील आरोपींचा तांत्रिक कौशल्याचा वापर करुन व शिताफीने शोध घेवुन आरोपी दिपक किरण थापा, वय ३२ वर्ष, रोशन पदम साही, वय २४ वर्ष, मानबहादुर उपेंद्र उर्फ सहविर सोनार (सुनार), वय ३६ वर्ष सध्या रा. धनसिंग यांचे रुममध्ये रबाळे, नवीमुंबई मुळ रा.ग्रा.पो.बांगेसिमल, ता.जि.सुरकेत, राष्ट्र- नेपाळ,दिपक उर्फ राजु उर्फ रतन अमरबहादुर शहा (साही) वय ३५ वर्ष सध्या रा. धनसिंग यांचे रुममध्ये रबाळे, नवीमुंबई मुळ रा.ग्रा.राजापुर, पो.गिलेरीया, ता.जि.बरदीया, राष्ट्र- नेपाळ यांना अटक करण्यात आली असुन त्याच्याकडून एकुण ६,३५,९००/-रुपये किंमतीचा माल त्यामध्ये सोन्या-चांदी, अमेरीकन डॉलर, लॅपटॉप, मोबाईल, इस्त्री व रोख रक्कम हस्तगत करण्यात आला आहे.


   यापैकी अर्नाळा सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १३२/२०२० भा.दं.वि.सं.कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ मधील एकुण २,४४,६००/-रुपयाचा माल व मध्यवर्ती पोलीस ठाणे ठाणे शहर गुन्हा रजि.नं. ४६/२०२० भा.दं.वि.सं.कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ मधील एकुण ३,९१,३००/-रुपये किंमतीचा इलेक्ट्रीक माल हस्तगत करण्यात आला असुन सदर आरोपीत हे सराईत गुन्हेगार असुन त्यांना भिंतीस होल पाडुन तसेच लॉचलॉक तोडुन घर फोडी चोरी करण्याचे सवयी असुन त्याचे विरुध्द घरफोडीचे अनेकविध गुन्हे दाखल आहेत. 


   सदर गुन्हा घडल्यानंतर उप विभागीय पोलीस अधिकारी विरार विभाग, विरार व अर्नाळा सागरी पोलीस ठाणेचे मा. प्रभारी अधिकारी श्री.महेश शेटये यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरीक्षक शिवाजी खाडे, सफौ/सांगळे, पो.हवा./१०४० शंकर वळवी, पोना/अलगट, पो.ना/भोये, पो.शि./पवार, पोशि/कदम, पोशि/काबळे यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करुन आरोपींचा शिताफीने,मेहनतीने शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे.


 


टिप्पण्या