शिमगोत्सवासाठी कोकणवाशियांना कोरे च्या विशेष गाड्या


मुंबई (प्रतिनिधी) अखंड महाराष्ट्रात कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.कोकण रहिवाशी मुंबईतील चाकरमानी आपल्या गावी पालखीची रुपे,होळीचा सण साजरा करण्यासाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणात गावाला जात असतात.कोकणातील हा उत्साहाचा सण सुरक्षित रित्या साजरा तसेच कोकणवाशियांना प्रवाश सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वेने विशेष गाड्यांची सोय केली आहे.


गाडी क्रमांक ०१०३९/०१०४० एलटीटी-करमाळी साप्ताहिक


गाडी क्रमांक ०१०३९ ही गाडी ६,१३,२०,२७ मार्च रोजी रात्री ८.४५ ला एलटीटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० ला करमाळी स्थानकात पोहोचेल. गाडी क्रमाक ०१०४० ही विशेष गाडी ८,१५,२२,२९ मार्च रोजी दुपारी १ वाजता करमाळीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० ला एलटीटी स्थानकात पोहोचेल.


गाडीचे थांबे


  या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकात थांबा देण्यात आला आहे.


गाडी क्रमांक ०१०४२/०१०४१ करमाळी-पनवेल-करमाळी साप्ताहिक • गाडी क्रमांक ०१०४२ ही गाडी ७,१४,२१ आणि २८ मार्च रोजी सकाळी १०.३० करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८.१५ ला पनवेल स्थानकात पोहोचेल.


गाडी क्रमांक ०१०४१ ही गाडी ७,१४,२१ आणि २८ मार्च रोजी रात्री ९ वाजता पनवेलहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ ला पनवेल स्थानकात पोहोचेल.


गाडीचे थांबे


  थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळुण, खेड, माणगाव, रोहा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.


गाडी क्रमांक ०१०४३/०१०४४ लोकमान्य टिळक टर्मिनसकरमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस


गाडी क्रमांक ०१०४३ ही गाडी २१ फेब्रुवारी आणि ६ मार्च रोजी मध्यरात्री १.१० ला एलटीटीहून सुटेल आणि त्याचदिवशी दुपारी १२.३० करमाळी स्थानकात पोहोचेल.


गाडी क्रमांक ०१०४४ ही गाडी २१ फेब्रुवारी आणि ६ मार्च रोजी दुपारी १ वाजता करमाळी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० ला एलटीटी स्थानकात पोहोचेल.


   गाडीचे थांबे -ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहेत.


टिप्पण्या