एटीएम सेंटरमध्ये वयोवृद्धांना लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांच्या कासारवडवली पोलीसांनी आवळल्या मुसक्या


ठाणे (प्रतिनिधी) ATM सेंटर मध्ये जावून वयोवृदध इसमांचे ATM कार्ड हातचलाखीने अदलाबदल करून लुबाडणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना ७२ तासांच्या आत मुद्देमालासह अटक करण्यात कासारवडवली पोलीसांना यश आले आहे.


      १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी १९.३० वाजण्याच्या सुमारास ज्येष्ठ नागरिक श्री सदानंद भास्कर वैद्य वय-६४ वर्षे,धंदा-सेवानिवृत,राहणार-आनंदनगर घोडबंदर ठाणे, हे कॉर्पोरेशन बँकचे ATM मध्ये पैसे काढण्याकरीता गेले असता त्यांनी ATM मधून पैसे काढल्यानंतर तेथे एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला व त्याने संदानंद वैद्य यांना बोलण्यात गुंतवून त्यांचा विश्वास संपादन करुन हात-चलाखीने फिर्यादी यांचे हातातील ATM कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर ATM कार्ड द्वारे १९,०००/- रुपये काढून त्यांची आर्थिक फसवणूक केलेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कासारवडवली पोलीस स्टेशन येथे दिनांक ३/२/२०२० वा.गु.रजि. क्रमांक २५/२०२० IPC ४२० प्रमाणे अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.


    सदर गुन्ह्याचा प्रकार पाहता यातील अनोळखी आरोपी निष्पन्न कस्न त्यांना तात्काळ अटक करणे कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.किशोर खैरनार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि सागर जाधव व त्यांचे पथक यांना योग्य त्या सूचना देवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते.त्याचप्रमाणे स.पो.नि सागर जाधव व त्यांचे पथक यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी जावून त्यांनी त्यांचे गुप्त बातमीदार यांना याबाबत माहिती दिली.तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी यांची जेल तसेच इतर पोलीस स्टेशन येथून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.प्राप्त माहितीच्या आधारे आरोपीत हे कुर्ला,साकीनाका,नवीमुंबई येथील असावेत याबाबत माहिती मिळाल्याने पोलीस पथक हे वेगवेगळ्या ठिकाणी जावून त्यांनी यातील आरोपीत यांचे ठावठीकाण्याबाबत माहिती घेतली असता आरोपीत हे मुंबा, रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती प्राप्त झाली.(janshakticha dabav news)


    सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून आरोपीत नामे १) गिया सुदिन अबू सिद्धिकी,वय-२६ वर्षे,धंदा-बेकार,राहणार- मुंब्रा व २) शैझान अब्दुल रेहमान आगा,वय-२४ वर्षे,धंदा-बेकार,राहणार-मुंब्रा यांना ताब्यात घेवून दिनांक ६.२.२०२० रोजी ०२.५४ वा अटक करण्यात आलेली असून त्यांचे कडून गुन्ह्यातील ४७,५००/- रुपये किमतीचे OPPO RENO कंपनीचे 2 दोन मोबाईल फोन, एक One Plus व OPPO कंपनीचा मोबाईल फोन असे एकूण ४ मोबाईल फोन, २२००/- रुपये रोख रक्कम असा एकूण १,०४,४००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत कस्न नमूद गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे. पोलीस तपासा दरम्यान आरोपीत यांचे कडून State bank of India, Bank of Baroda, Union Bank, ICICI Bank, HDFC, Bank of Maharashtra, Corporation Bank, Kotak, Syndicate, GP Parsik,oriental, IDBI ,Vijaya Bank, Uco या सारख्या बँकेचे ५५ हून अधिक ATM कार्ड जप्त करण्यात आलेले असून नमूद त्याबाबत संबंधित बँकाना पत्रव्यवहार करून त्याबाबतचा पुढील तपास सुरु आहे. 


    अटक आरोपीत हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर यापूर्वी कुर्ला,कल्याण,ठाणे,भिवंडी येथे ८ हून अधिक गुन्हे दाखल असून आरोपीत यांनी कळवा,मुंब्रा,कासारवडवली,नवी मुंबई,पुणे,मुंबई,जयपूर,सोलापूर,कर्नाटक व इतर ठिकाणी ATM कार्ड (janshakticha dabav news) हातचलाखीने अदलाबदल कस्न फसवणूक केलेबाबत २० हून अधिक गुन्हे केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होत असून त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.


    सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री.विवेक फणसळकर,मा.सह पोलीस आयुक्त.श्री.सुरेश कुमार मेकला,मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे श्री.अनिल कुंभारे मा.पोलीस उपायुक्त,परिमंडळ ५ श्री.अविनाश अंबुरे,मा.सहायक पोलीस आयुक्त,वर्तक नगर विभाग श्री. पंकज शिरसाट यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, स.पो.नि सागर जाधव,पो.उप.नि केसरे,पोलीस हवलदार अंकुश पाटील/५६०४.पोलीस हवा! ५०४७ एस.बी.खरात,आर.एस चौधरी,पो.ना १७८ आर.एस महापुरे पो.ना/तायडे १२६३ C गोना/५९११घोडके यांनी केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि एस.बी.जाधव हे करीत आहेत.(janshakticha dabav news)


टिप्पण्या