कुणबी समाज विकास संघ( रजि.), मुलुंड आयोजित रक्तदान शिबिराला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
२५१ बँग्जचे केले संकलन
मुंबई: (विशाल मोरे )रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन कुणबी समाज विकास संघ (रजि.)मुलुंड संलग्न कुणबी युवक मंडळ आयोजित भव्य रक्तदान शिबीर ब्लड लाईन चारिटेबल ब्लड बँक ठाणे यांच्या विद्यमाने रविवार दिनांक ०९/०२/२०२० गोशाळा म्युनिसिपल गोशाळा शाळा,गोशाळा रोड, मुलुंड येथे खूप मोठया उत्साहात पार पडले. या शिबिरात २५१ रक्तदात्यांचे अमूल्य योगदान लाभले या बद्दल वरिष्ठ मंडळाचे सरचिटणीस श्री विनायक घाणेकर व उपाध्यक्ष श्री पांडुरंग गावडे व कुणबी समाज पतपेढीचे अध्यक्ष श्री तानाजी निकम यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले. तसेच २५१ रक्तदाते/ रक्त पिशव्या यशस्वी संकलन केल्या बद्दल युवाध्यक्ष श्री आशिष पाटील यांनी आभार व सर्व श्रेय युवक युवती सर्व कार्यकर्ते यांना दिले.अगामी काळात याच्या पेक्ष्या जास्त रक्त संकलन करण्याचा उपरोक्त संघटनेचा मानस आहे.
या रक्तदाना शिबिराला सामाजिक क्षेत्रातले अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन मंडळालाचे अभिनंदन केले.
सदर रक्तदानाच्या मुख्य दिवशी अधिकाधिक रक्तदात्यांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने गेले पंधरा दिवस युवक मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत होते. संस्थेचे अध्यक्ष श्री.उमेशजी पाटील यांच्या कणखर नेतृत्वाखाली वर्षभरात कुणबी युवक मंडळ, मुलुंड विविध प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करत असतात.सदर रक्तदान शिबिराला कुणबी समाज विकास संघाचे वरिष्ठ मंडळ , युवक मंडळ तसेच महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा