नवीमुंबई सीवूड येथील होम्स इमारतीला भीषण आग
नवी मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबईच्या सीवूड येथील सेक्टर ४४ च्या सी होम्स इमारतीला सकाळी लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाचे ७ जवान यावेळी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी जवानांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. इमारतीच्या २०व्या आणि २१व्या मजल्यावर ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली असून रहिवाशांना इमारतीतून खाली आणण्यात आले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा