रत्नागिरी-डोंबिवलीकर फाऊंडेशनचे दुसरे स्नेहसंमेलन डोंबिवलीत


डोंबिवली (प्रतिनिधी) रत्नागिरी-डोंबिवली फाऊंडेशनचे यावर्षीचे दुसरे स्नेहसंमेलनाचे आयोजन कै.आनंद दिघे सभागृह,गांधीनगर येथे रविवार दि.16 फेब्रुवारी 2020 रोजी करण्यात आले आहे.या कार्यक्रमाची वेळ सायं.५ ते रात्रौ.९ वाजेपर्यंत असणार आहे.


   धावत्या युगात आपल्या गावातील बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी ही संस्था मागील 2 वर्ष काम करत आहे . आपल्या माणसाच्या सुखदुःखात , सामील होत यांनी मागील 2 वर्षात सेवाभावी कामे ही केली आहेत. गेल्या वर्षी अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या जनतेला अन्न धान्यही वाटप केले .तर कुणाला हॉस्पिटल , शाळा - कॉलेज मध्ये शिकणाऱ्या मुलामुलींना आर्थिक सहाय्य करणे , घरगुती सोहळे साठी मदत करणे, वाढदिवस साजरे करणे , गणपती उत्सव निमित्त बस सेवा स्वस्त दरात उपलब्ध करुन देणे, शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या मुलांचा गुणगौरव करणे पुढील शिक्षणास प्रोत्साहन देणे,रोजगार उपलब्ध करुन देणे अशा प्रकारे अनेक समाजोपयोगी कामे रत्नागिरी-डोंबिवली फाऊंडेशन या संस्थेमार्फत करणात येत आहे.


  श्री जगदीश गोविंद जुलूम हे या संस्थेचे अध्यक्ष असून तरुण वर्गाला एकत्र करून सहकारातून त्यांनी आपली प्रगती करावी यासाठी प्रयत्न करत आहेत. या संस्थेचा स्नेहसंमेलन रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी आनंद दिघे सभागृह गांधीनगर डोंबिवली पूर्व येथे पार पडणार असून डोंबिवलीत जनतेने  सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी केले आहे.


टिप्पण्या