दिव्यात छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी.

ठाणे (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव मंच आयोजित आज अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने  दिव्यात सर्वधर्म समभाव या छत्राखाली छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


   यावेळी सर्वधर्मीय एकत्र येऊन हजारोंच्या संख्येने मिरवणूक काढण्यात आली. शालेय विध्यार्थी,शिक्षक,  सामाजिक व राजकीय संघटना,सर्व राजकीय पक्षाचे समाजसेवक, वारकरी, लेझीमपथक, ढोलताशा पथक, यांनी एकत्र येऊन एकात्मतेचा संदेश देऊन आज पहाटे शंभर पेक्षा जास्त मावळे दुर्गाडी किल्याहून शिवज्योत आणण्यासाठी धावले.तर उत्सव मंचातर्फे रक्त्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. व भव्यवदिव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रसंगी ठाणे अग्निशमन दल व पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली. पोलीस अधिकारी शिंदे, क्षीरसागर,सरडे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते. मिरवणुकी दरम्यान अनेक संस्थांनी पाणी व सरबत याचे आयोजन करण्यात आले होते.


टिप्पण्या