दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात संदीप कानसे गृप (साई श्रध्दा प्रस्तुत) बहुरंगी नमन सादर होणार


"अग्नी आहे साक्षीला" हे वगनाट्य होणार सादर


मुंबई (शांताराम  गुडेकर/दिपक कारकर )  मुंबई रंगभूमीवर लोकप्रिय असणारे साई श्रध्दा प्रस्तुत,नमनप्रेमी संदीप कानसे ग्रूप यांचे स्त्री-पात्रमय बहुरंगी नमन सालाबादप्रमाणे खास रसिक आग्रहासत्व गणेश कांबळे सह खंडाळा प्रिमीअर लिग आयोजित अर्चना थिअटर निर्मित साईश्रद्धा प्रस्तुत  (कानसेगृप)साईश्रद्धाकलापथकाच्या ७५ कलाकारांच्या ताफ्यातील ज्येष्ठ गायक,  गायिका, वादक अभिनेते यांच्या उत्तम सादरीकरणानंतर  नवोदित  गायक, वादक , संगीतकार, कलाकार घडविण्याच्या हेतूने नवीन कलाकारांना संधी देऊन या मोसमातील मुंबई रंगमंचावरील पाचवा प्रयोग बहुरंगी नमन गणरायाला नमन, गण,गौळणसह नवोदित कलाकारांच्या 


संचात येणार वगनाट्याला वळण असे


कै. धोंडू कानसे लिखित संदिप कानसे पुर्नलिखित दिग्दर्शित अन्यायाविरूद्ध वाचा फोडणारे नवीन ज्वलंत वगनाट्य "अग्नी आहे साक्षीला" सादरीकरण होणार आहे.


पार्श्वगायिका - शिवन्या मांडवकर,पार्श्वगायक- संदेश पालकर, अमोल भातडे, चंद्रकांत साळवी, अक्षय काजारे असून मृदूंग/ढोलकीपट्टू प्रभाकर मास्कर,संगीत-  संकेत मांडवकर,पँडवालं - कल्पेश ओर्पे,बेंन्जो/बुलबूल- अजय धनावडे यांचे आहे.हा प्रयोग शनिवार दि.२९ फेब्रुवारी २०२० रात्री ८:००वा.शिवाजी मंदिर नाट्यगृह,दादर  (पश्चिम ) येथे रंगणार आहे.तरी नमन रसिक व कोकणवाशीय मुंबईकर यांनी या नमनला मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.अधिक माहीतीसाठी विकास गुरव ८४३३५३८०८८/गणेश कांबळे ७५०६२०७३६१/संदीप कानसे ९८२१५८६१४४ यांच्याशी संपर्क साधावा.


टिप्पण्या