अविअनिल कलामंच आयोजित दिनानाथ नाट्यगृहात कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन
मुंबई (दिपक मांडवकर) अविअनिल कलामंच आयोजित चौरंग प्रस्तुत नवकला निर्मित अष्टविनायक कलामंच मुंबई यांचे स्त्री पात्रांनी नटलेले कोकणचे खेळे तथा बहुरंगी नमन बुधवार दि.12 फेब्रुवारी 2020 रोजी रात्रौ 8.30 वा.मुंबईतील दिनानाथ नाट्यगृह येथे पार पडणार आहे.कोकणातील मुंबई रहिवाशी तसेच नमन प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
सदर बहुरंगी नमनाच्या सादरीकरणात कृष्णाच्या अफलातून भुमिकेत अथर्व दिसणार आहे.तसेच नवीन गाण्यांच्या चालीवर आणि शाहीर रुपेश खर्डे यांच्या सुमधूर आवाजात रंगणार ठसकेबाज विनोदी गौळण आणि वाकड्या पेंद्याची धमाल उडवणारा हा कार्यक्रम आहे.तसेच सादरीकरणात महान पौराणिक कलाकृती बंदीशाळा हे दाखविण्यात येणार आहेत.विशेष म्हणजे बाळकृष्णाने पुतनामावशीचा वध कसा केला या चित्रण लोकांना पहावयास मिळणार आहे. सहित संदिप कानसे लिखीत चित्तथरारक काल्पनिक वगनाट्य रक्तात रंगला राजमुकूट पार पडणार आहे.
यामध्ये नमनात प्राजक्ता कालोखे, कोमल जाधव,दिपाली मांडवकर,प्रतिक्षा गावडे,प्रिती महेश मोर्ये,राजेश डोंगरे,अभिजित वलावटे,रोहीत पवार,कल्पेश गुरव,गुरुप्रसाद शिवगण,दिगंबर भोवड,योगेश मसणे,रविंद्र गुरव,सुर्यकांत खर्डे,महेंद्र गितये,कल्पेश खर्डे,निलेश मोर्ये आदी कलाकार काम करणार आहेत.कार्यक्रमाचे निर्माता सचिन खर्डे, लेखक रविंद्र घाणेकर सर,दिग्दर्शक नितिन शिंदे,गितरचना संतोष कोलापटे,गायक रुपेश खर्डे,सुकांत आयरे,सचिन खर्डे,गायिका ममता कांबळे,मृदुंगमणी समीर भास्कर,आक्टोपॅड रुपेश संगितकार विशाल सुकम,रंगभुषा योगेश नवाले,नैपथ्य गणेश मांडवे,सुत्रधार महेश मोर्ये,सहाय्यक संदिप तरळ,विशेष सहकार्य अभिलाषा क्रिएशन मुंबई यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा