लोटे येथील अनधिकृत गोशाळेविरोधात सोनगाव ग्रामस्थ आक्रमक ; एमआयडीसी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरवात
खेड प्रतिनिधी : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीच्या जागेवर असलेल्या अनधिकृत गोशाळेच्या विरोधात सोनगाव व परिसरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून येथील ग्रामस्थांनी खेर्डी एमआयडीसी कार्याल्यासमोर आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. जो पर्यंत या अनधिकृत गोशाळेवर कारवाई होत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला असल्याने एमआयडीसी कार्यलयाच्या अधिकाऱ्यांसमोर चांगलाच पेच निर्माण झाला आहे. लोटे औद्योगीक क्षेत्र परीरातील एम आय डी सी च्या सुमारे चार एकर जागेवर ज्ञानेश्वर माउली मुक्तिधाम गोशाळा आहे. हभप भगवान कोकरे या गो शाळेचे संस्थापक संचालक आहेत. कोकरे महाराज यांनी एमआयडीसीच्या जागेवर उभारलेली ही गोशाळा सोनगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून ही गोशाळा उभारताना ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. या गोशाळेमध्ये असलेल्या गाई या दिवसरात्र परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात घुसून शेतीचे नुकसान करत असतात किंवा या गाईंचा डेरा महामार्गावर असतो त्यामुळे महामार्गावर वारंवार अपघात देखील होत असतात. या गोशाळेच्या बाजूने सोनगाव येथे जाणारा एक नैसर्गिक ओढा अ...